योजना

धर्मादाय रुग्णालय योजना 

मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम,१९५० मधील कलम ४१ क क अन्वये धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब व निर्धन रुग्णांसाठी खाटा सवलतीच्या दराने व मोफत राखुन ठेवणे. तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी मंजूर केलेल्या योजनेतील तरतूदींचे पालन करणे (सदर योजनेची यादी charity.maharashtra.gov.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच टोल फ्री दुरध्वनी क्र. १८००२२२२७० आहे.) 

१) निर्धन पात्र लाभार्थी रुग्ण

  • ज्या रुग्णाचे वार्षिक उत्पन्न रु. ८५ हजार इतके आहे. त्यांना १० टक्के राखीव खाटा १००% मोफत उपचाराकरीता आरक्षित ठेवणे. 

२) दुर्बल घटकांतील लाभार्थी रुग्ण 

  • ज्या रुग्णाचे वार्षिक उत्पन्न रु. १,६०,०००/- इतके आहे. त्यांना १० टक्के राखीव खाटा ५०% सवलतीच्या दरात उपचाराकरीता आरक्षित ठेवणे. 

३) सादर करावयाची कागदपत्रे

  • रेशनकार्ड 
  • उत्पन्नाचा दाखला (तहसिलदारांकडून मान्यता प्राप्त) 
  • दारिद्रय रेषेखालील पत्रिका

 ४) वैदयकीय लाभ 

  • रुग्णांनी/रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील वैदयकीय समाज सेवक यांना भेटून आपली माहिती व वरील वैदयकीय कागदपत्रे तपासणीसाठी दयावीत. 
  • तातडीच्या वेळी धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांस ताबडतोब दाखल करुन घेवून रुग्ण स्थिर होईपर्यंत वैदयकीय सुविधा उपलब्ध करुन देणे. 
  • वैदयकीय समाज सेवकांनी रुग्णांस दाखल केलेल्या वैदयकीय कागदपत्रांची चौकशी त्यांना रुग्णालयातील डॉक्टरांशी पुढील उपचाराकरीता समन्वय करुन देणे. 

५) रुग्णांना रुग्णालयातील उपचाराबाबत काही अडचण आल्यास

  • संबधित धर्मादाय निरीक्षक/धर्मादाय कार्यालयाशी संपर्क साधणे. 
  • लेखी स्वरुपात म्हणणे त्यांच्याकडे मांडणे. 
  • (टोल फ्री दुरध्वनी क्र. १८००२२२२७० व वेबसाईट – charity.maharashtra.gov.in)

6. रुग्णांने आपले लेखी मत धर्मादाय कार्यालयाकडे सादर करावे, मत सादर केल्यानंतर रुग्णालयातील प्रतिनिधी तसेच रुग्ण किंवा रुग्णांचे नातेवाईक यांचे दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकुन धर्मादाय आयुक्त निर्णय देतात. 

7. आवश्यकता असल्यास मुख्यमंत्री कार्यालयात (मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष) कार्यरत असलेले धर्मादाय निरीक्षक यांच्याशी रुग्णांनी संपर्क करुन त्यांच्या प्रकरणाची चौकशी करावी व त्यांची मदत घ्यावी.

निर्बल व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयामध्ये मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार

Charity.maharashtra.gov.in या Website वर SMS व E-Mail द्वारे “बेड उपलब्धता पहा” यामध्ये रुग्णालयातील संपर्क व्यक्ती व उपलब्ध खाटांच्या माहितीची सुविधा

निवडक सरकारी व महानगरपालिका रुग्णालयात Smart TV वर धर्मादाय रुग्णालयांतील उपलब्ध खाटा व इतर माहितीची सुविधा

पसा वि.व्य.अधिनियम १९५० चे कलम ४१ क क अंतर्गत मा. उच्च न्यायालय मंत याचिका (पी.आय.एल.) क्र. ३१३२/०४ मध्ये मंजूर केलेली योजना दि.०१/० अंमलात आली आहे, अधिक माहितीकरिता संपर्क साधा – टोल फ्री क्र. १८००२२२२७० Website: charity.maharashtra.gov.in उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट लेली योजना दि.०१/०९/२००६ पासून

mahacmmrf.com © 2022 All rights reserved

Design By ORNET Technologies Pvt. Ltd.

Skip to content