महाराष्ट्राच्या पुण्यभुमितील प्रत्येकाला सुदृढ आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना मी देवाकडे करत असतो. दुर्दैवाने आपल्या अनेक बंधु-भगिनींना विविध आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यातील प्रत्येकाला चांगले औषधोपचार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठीच गरजू रुग्णांना औषधोपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधीच्या माध्यमातून मदत उपलब्ध करुन देण्यात येत असते. आजपर्यंत राज्यातील लाखो गरजवंतापर्यंत पोहचण्यास आम्ही यशस्वी झाल्याचे आनंद आहे.
पुढील काळात राज्यातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारत आहोत. नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी उपलब्ध टोल फ्री क्रमांक असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातील कुणीही मदतीपासून वंचित राहू नये हाच आमचा उद्देश आहे. यातूनच प्रत्येक गरजूला मदत उपलब्ध करुन देण्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष नक्कीच यशस्वी होईल, हा माझा विश्वास आहे.
पुन्हा एकदा सांगू इच्छितो, गरजू- गरिबांनी घाबरु नका हे तुमचे सरकार आहे. आम्ही तुमच्या मदतीस सदैव तत्पर आहोत.
आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी “अर्ज स्थिती” इथे क्लिक कराव.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून गेली अनेक वर्षे गरजू रुग्णांच्या सेवेची संधी मला मिळाली. संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध भागात रुग्णांना मदत उपलब्ध करुन देऊ शकलो. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा (कक्ष प्रमुख) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून गरजूंची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करत सर्वांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील, यासाठी आपल्या सदीच्छा आणि आशिर्वाद सर्देव पाठीशी राहू द्या.
मंगेश चिवटे..
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख
मदतीसाठी वरील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या
वैद्यकीय सहायता निधी संबंधी आपले प्रश्न विचारण्यासाठी वरील बटन वर क्लिक करावे.
View this profile on Instagram@c_m_r_f_ • Instagram photos and videos